विसापुर येथे रमाई जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेत बुक व पेन वाटप कार्यक्रम

0
381

विसापुर येथे रमाई जयंती निमित्त जिल्हा परिषद शाळेत बुक व पेन वाटप कार्यक्रम


विसापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यात यांच्या खारीच्या वाटा आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विसापूर येथे भीमशक्ती युवा ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना मोफत बुक व पेनाचे वितरण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दुर्गे सर यांनी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विद्यार्थ्यांना रमाई बद्दल माहिती देण्यात आली.

भीमशक्तीचे सिद्धांत पुणेकर यांनी विद्यार्थ्यांचे संवाद साधला व विद्यार्थ्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भीमशक्ती युवा ग्रुपचे प्रथम दुपारे, सौरभ देठे, सुमेध चालखुरे, सुविभ उमरे, प्रसाद दाते, रितिक जयकर, प्रवीण पुणेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व मनोगत पंचशीला पाटील मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here