संगमनेर शहरात चक्री वादळ!

0
1652

संगमनेर शहरात चक्री वादळ!
गारांच्या माराने ही झोपटले….

 

 

अहमदनगर
संगमनेर..१०/६/२०२२
(वृत्त प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहराला काल दुपारी सुमारे दोन तास चक्री वादळाचा तडाखा बसला असून, करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त असून , यात आता पर्यंत संगमनेर ग्रामीण विभागात अकलापुर येथे आदिवासी परिवारातील तिंघाचा मृत्यू झाला आहे.

 

अनेक शेतकरी यांच्या ,शेतातील गोठा, रहाती घरे यांचे छप्पर उडाले असून, प्रसिद्ध पोल्ट्री व्यावसायिक काशीद यांच्या तीन पोल्ट्री चे पत्रे उडून गेले आहेत. या चक्री वादळाचा फटका संगमनेर शहराला मोठ्या प्रमाणात बसला असून , रस्त्यावर झाडांचा उन्मळलेला अवस्थेत मोठा खच पडलेला दिसून आला. सार्वजनिक बांधकाम विभागात मोठाले वृक्ष उन्मळून पडले आहेत. “वृक्ष उन्मळून पडल्याने काही गाड्या , मोटार सायकल आदींचे मोठे नुकसान झालेच चित्र जागोजागी दिसत होते.” गुंजाळ वाडी रोड वर अनेक गाड्या गटारात रुतल्याचे चित्र ही समोर आले. अनेक ठिकाणी रस्त्यावर वृक्ष पडल्याने वाहतूकोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. गटारांची तुंबई पुन्हा एकदा नजरेस आली. फ्लेक्स बोर्ड करिता लावण्यात आलेले मनोरे ही उध्वस्त झाले असून , कार पार्किंगच्या शेड ही उडाल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत होते.

 

राज्य विद्युत मंडळ यांचा वीज पुरवठा खंडित असून , विजेचे अनेक खांब जमीनदोस्त झाले आहेत. संगमनेर मध्ये काही भागात रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाला असला तरी अनेक ठिकाणी दोन दिवस तरी वीज पुरवठा सुरळीत होईल याची खात्री देता येणार नाही. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीज वाहक तारा निखळल्या असून त्याची जोडणी करणे खूपच मोठे काम असल्याचे राज्य विद्युत मंडळ अधिकारी यांनी आमच्या वार्ताहर बरोबर बोलताना सांगितले.

 

अचानक आलेल्या वादळाने व सोबत मोठ्या प्रमाणात पडलेल्या गारानी जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र स्पष्ट दर्शवित होते. नवीन नगर रोड या महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे दोन फूट पाणी वाहत होते, तर लिंक रोड वर मोठ्या प्रमाणात माती वाहून गेल्याने मोठाले खड्डे पडले आहेत.

 

वास्तविक झाडांचे प्रतेक वर्षी महावितरण , सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका यांनी संयुक्त पणे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे… या बाबत सदर काम तिन्ही ही संस्था ठेकेदारी पद्धतीने करतात. ठेकेदार काय मरामत करतो या कडे अधिकारी सुरळीत डोळे झाक करतात . चक्री वादळ ही नैसर्गिक आपत्ती असली तरी नियोजनामुळे मोठी हानी टळू शकते. व्यवस्थापन नसल्याचे आढळून आल्याने सदर चित्र व नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. वीज वाहक तारा यांच्या खालीच नगरपालिका झाडे का लावते ,असा ही प्रश्न नागरिक विचारात आहेत. नगरपालिकेचा ढेसुळ नियोजन या अपत्तीस कारणीभूत असल्याचे नागरिक चर्चा करताना दिसत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःचे रक्षण करू शकत नसून , नागरिकांचे काय करणार असा ही प्रश्न लोक काल विचारात होते. वाहतूक सुरळीत करण्यास ट्रॅफिक पोलिस कर्मचारी मदत करत असल्याचे चित्र दिसले, तर बघ्यांची मोठी गर्दी गावातून फेरफटका मारताना दिसत होती. नीच्छित नुकसानीचे आकडे समोर आले नसले तरी हे नुकसान काही कोटीत असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here