भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना तुरुंगात टाका…!

0
662

भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना तुरुंगात टाका…!

अन्यथा घुग्घुस शहर मुस्लिम समाजाकडून तीव्र रॅली आंदोलन

 

 

घुग्घुस (चंद्रपूर)/प्रतिनिधी
महम्मद पैगंबर यांच्यावर आपत्तीजनक टिपण्णी करत मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याने घुग्घुस मुस्लिम समाजाने भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांना देशात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता तातडीने तुरुंगात टाकण्याची मागणी घुग्घुसचे ठाणेदार तसेच माननीय पंतप्रधान यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

 

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विनंतीद्वारे मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु आले वसल्लम यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून मुस्लिम धर्माचे लोक व धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर तातडीने कारवाई करून त्यांच्या विरोधात IPC कलम 295A, 295B, 298, 294, 153A, 505B अंतर्गत अटक व कडक कारवाई करण्यात यावी. तसेच या दोघांनाही लवकरात लवकर कारागृहात टाकण्यात यावे. यावर लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास येत्या जुम्माच्या दिवशी घुग्गुस शहर येथील मशिदीतून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

 

दिनांक 17 जून 2022 ला मिरवणूक (वॉकिंग रॅली) काढण्यात येईल अथवा पोलीस ठाण्यापर्यंत निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात येईल. ज्याची सर्व जबाबदारी शासन, प्रशासन यांची असेल. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here