पुराचे पाणी साचलेल्या भागात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदत कार्य

0
389

पुराचे पाणी साचलेल्या भागात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदत कार्य

विविध भागात मदत कार्यासाठी चार पथकाचे गठण

 

 

मागील चार दिवसापासुन पावसाचा जोर कायम असल्याने शहरातील अनेक लोकवस्त्यांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. अशा ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदत कार्य सुरु करण्यात आले असून विविध भागात मदत कार्यासाठी चार पथकाचे गठण करण्यात आले आहे. घरात पाणी शिरल्याने पाण्यात बुडालेल्या जिवनावश्यक वस्तु बाहेर काढण्यात यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते मदत करत आहे. तसेच सदर पिडीत नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ठिकाणीही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

 

चंद्रपूरात पावसाचा कहर सुरु आहे. मागील चार दिवसापासुन पावसाची झड सुरु असल्याने इरई धरणाचे दरवाजे उघडण्यात आली आहे. परिणामी नदीकाठच्या अनेक भागातील लोकवस्तींमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना घरे खाली करण्याचे आवाहण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यात चंद्रपूरातील रहमतनगर आणि भिवापुर वार्डातील भंगराम भागाचाही समावेश आहे. या भागात पाणी शिरल्याने येथील नागरिकांपूढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता या भागात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची चार पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातुन नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक सामान बाहेर काढण्याचे काम केल्या जात आहे. तसेच येथील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या आंबेकर ले आउट येथील ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, किदवाइ स्कुल, नेहरु शाळा आणि भिवापूर येथील माना शाळा येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलिम शेख, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, दिनेश इंगळे, विक्की रेगंटीवार, राजिक खान, फैजान शेख, जमिर खातिब, जामु घोटेकर, आदि कार्यकर्ते मदत कार्यात सहभागी झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here