मुकूटबन ग्रामपंचायत माहिती देण्यास टाळाटाळ

0
653

मुकूटबन ग्रामपंचायत माहिती देण्यास टाळाटाळ

ग्रामपंचायत व्यवहारात लाखोंचा भ्रष्टाचार

 

झरी तालुक्यातील मुकूटबन ग्रामपंचायत ही नेहमी वादाच्या भोवऱ्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायत मध्ये नवीन सदस्य बसून वर्ष होत आहे. तरी सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांचा तंटा संपता संपेना. बऱ्याच लोकांनी सदस्यांच रोजचं गाण समजून ग्रामपंचायत कडे पाठ फिरवीली असल्याची चर्चा आहे.

तसेच मागील महिन्यात मुकूटबन येथील माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी ग्रामपंचायत कार्यालयात वर्षभरात झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती मागितली. कालावधी नंतरही माहिती देण्यात आली नाही. यावरून असे दिसून येते की काद्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायदा विसरून जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत मध्ये व्यवहारात अफरातफर झाली की नाही हे गूढ माहीती मिळताच कळेल. परंतु माहिती देण्यस नकार म्हणजे लाखोंचा भ्रष्टाचार असा अंदाज वर्तविल्या जात आहे. अनेक ठिकाणी तशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू आहे. मागील दिवसात नालीच्या प्रश्नावरुन ग्रामपंचायत चे व त्यातील काही सदस्यांची नावे अनेक बातमी, वृत्तपत्रातून झळकले. मात्र याचा ग्रामपंचायत सदस्यांवर कवडीचा फरक पडला नाही. याच आठवड्यात एका सदस्याने मोबाईल वरून माहिती दिली की एका गल्लीतील सांडपाणी व्यवस्थीत जाण्यासाठी काम करण्यात यावे असे ग्रामपंचायत मध्ये अनेक वेळा सांगितलं. तरी सुद्धा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच लक्ष देत नाही. यावरून असेच दिसून येते की ग्रामपंचायत मध्ये सदस्यांचेच काही चालत नाही तर सामान्य नागरिकांची समस्या खरच मार्गी लागेल का…? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे पंचायत समिती प्रशासनाने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here