कायर जवळ सैदाबाद फाट्याजवळ झाला अपघात, एकाचा मृत्यू

0
386

कायर जवळ सैदाबाद फाट्याजवळ झाला अपघात, एकाचा मृत्यू

 

यवतमाळ, मनोज नवले
कायर जवळ असलेल्या सैदाबाद फाट्याजवळ काल 7 वाजताच्या सुमारास अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळच्या दरम्यान घडली.

वनी येथील प्रेमदास लक्ष्मण इंगोले हे मुकुटबन आपल्या दुकानाचे साहित्य आणण्याकरिता गेले होते. साहित्य घेऊन वणी साठी परतीचा प्रवास करीत असताना. कायर जवळ असलेल्या सैदाबाद फाट्याजवळ सोयाबीन भरून येत असलेल्या ट्रॅक्टर मध्ये त्याचे दुचाकी आदळली आणि प्रेमदास मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल होऊन गावकऱ्यांनी पोलिस स्टेशन शिरपूर यांना माहिती दिली. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. आणि मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता वनिता ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.

आणि ट्रॅक्टर चालक मालकावर कलम 304 भादवी गुन्हा दाखल करून. पुढील तपास गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल कोवे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here