सुप्रसिद्ध नितेश कराळे 28 नोव्हेम्बरला येणार गडचांदुर नगरीत

0
681

सुप्रसिद्ध नितेश कराळे 28 नोव्हेम्बरला येणार गडचांदुर नगरीत

 

प्रतिनिधी, प्रवीण मेश्राम
गडचांदूर नगरीतील PWD कार्यालयात दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोज सोमवारला एक दिवसीय भव्य ओबीसी परिषद घेणे बाबत सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सतीश मालेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. अनिल डहाके उपस्थीत होते.

येत्या 28 नोव्हेंबर 2021 रोजी एक दिवसीय भव्य ओबीसी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे राहणार आहे. ओबीसी ची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसी आरक्षणाचे काय फायदे,
समाजामध्ये ओबीसी जनजागृती व्हावी, आरक्षणाचे महत्त्व कळावे, सोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ओबीसी च्या विद्यार्थ्यांना महा ज्योती या संस्थेत अर्ज करण्यास संबंधात चर्चा करणे, केंद्र सरकारने ओबीसी यांची जनगणना थांबवली आहे. ती जात निहाय झाली पाहिजे. सरकारच्या ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ करावी. या विषयावर सभेत चर्चा करण्यात आली.

या सभेला प्रविण काकडे, अजय किनेकर, सुधाकरजी तुराणकर, गणेश तुराणकर, देवराव ठावरी, विलास कोंगरे, उमेश लांजेकर, नितेश भिवापुरे, सतिश बिडकर, कपनाथ ताजने, प्रविण लाटेलवार, संतोष निखाडे, शेख मुनिर, प्रविण मेश्राम, सतिश भोजेकर, अरविंद वाघमारे, अतुल ताजने, अतुल टोंगे, सुनिल अरकीलवार, करांसिंग भुरानी, तूरानकर, जूनघरी आदी समाजबांधव उपस्थित होता. सहविचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here