निसर्गाच्या सान्निध्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा मेळावा

0
590

निसर्गाच्या सान्निध्यात सेवानिवृत्त शिक्षकांचा मेळावा

 

कोठारी, राज जुनघरे
बल्लारपूर तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित महा मेळावा, वार्षिक आमसभा, व तालुक्यातील नवीन कार्यकारिणी गठित करण्या पर्यंत असा तिरंगी तथा बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक निसर्ग रम्य सानिध्यात महिपाल सिंग बाबा टेकडी येथे आयोजन करण्यात आले.


सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तालूका संघटनेचे अध्यक्ष सेवा निवृत्त मुख्याध्यापक वाघूजी टेकाम , प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक वासुदेव खाडे, तालुका संघटनेचे सचिव मनोहर पंदीलवार, चंद्रपूर जिल्हा संघटनेचे महासचिव पंढरी गौरकर, तथा रोहनी राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.सदर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन करीत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्ती काळात येणाऱ्या अडचणी, संघटनेचे कार्य, पेन्शन धारकांना होणारा त्रास आणि त्यातून संघटनेचे योगदान, संघटना वाढीसाठी प्रयत्न आदी विषयांवर मार्गदर्शन केले. मेळाव्याच्या निमित्ताने सत्तर ते पंच्याहत्तर वयोगटातील वयोवृद्ध शिक्षक तथा परिवारांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याच निमित्ताने नविन बल्लारपूर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली.

नविन कार्यकारिणीत अध्यक्ष वाघुजी टेकाम, उपाध्यक्ष विजय कांबळे, महिला उपाध्यक्ष रोहणी राऊत, कार्याध्यक्ष भय्याजी ढोंगे, सचिव सी.एस.उरकुडे, सहसचिव पत्रुजी चेरकुलवार, कोषाध्यक्ष ए.आर. शेख यांची निवड करण्यात आली.

महीपाल सिंग बाबा टेकडी परिसरात निसर्ग रम्य वातावरणात वनभोजनासह जुने अनुभव कथन करित मेळावा उत्साहात पार पडला. सरतेशेवटी उपस्थितांचे आभार वनकर गुरूजी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here