जंगल सत्याग्रहातील सहभागी स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतींना उजाळा…

0
739

जंगल सत्याग्रहातील सहभागी स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतींना उजाळा…
वंशजांचा सन्मानपत्र देऊन केला गौरव

 

वणी/मनोज नवले : दि. ४ ऑगस्ट १९३० रोजी वणीत झालेल्या जंगल सत्याग्रहातील सहभागी स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांच्या वंशजांच्या उपस्थितीत रामदेवबाबा परिसर स्थित असलेल्या स्म्रुती स्तंभाला जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मेघराज भंडारी व नगर वाचनालयाचे अध्यक्ष व जेष्ठ विचारवंत माधवराव सरपटवार यांच्या हस्ते हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. लगेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 

 

यावेळी वंशजांच्या सन्मानार्थ श्रीरामदेवबाब सामाजिक संस्था, इतिहास संकलन संस्था शाखा वणी, महापुरुष विचार, प्रचार, प्रसार व स्मारक संवर्धन समिती वणी च्या संयुक्त वतीने रामदेवबाबा संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघराज भंडारी, प्रमुख अतिथी माधवराव सरपटवार, हरिहर भागवत, समितीचे अध्यक्ष प्रा. कुंतलेश्वर तूरविले हे व्यासपीठावर विराजमान होते. यावेळी महात्मा गांधी व बापूजी अणे यांच्या छायाचित्राला हार अर्पण करण्यात आले. अतिथींनी आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिनिधी असलेले वंशज प्रा. अभिजित अणे, प्रमोद इंगोले, मंगेश देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करतांना आनंद होत आहे असे सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांच्या उपस्थित असलेल्या वंशजांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

 

या कार्यक्रमाला चंद्रकांत नागदेव, राजाभाऊ मारोडकर, प्रसन्नजी अठ्ठरकर, श्रीधर भाकरे, जितेंद्र भंडारी, विकेश पानघाटे, राहुल खारकर, रवि धुळे, चैतन्य तुरविले, सागर जाधव व इतर मान्यवर हजर होते.या कार्यक्रमाचे संचालन सृजन गौरकर तर प्रास्ताविक लोकसेवक अमित उपाध्ये व आभार हिंदू प्रखर विचारवंत निस्पृह कासार सागर मुने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here