शिरपूर ठाणेदाराच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायांचा सुळसुळाट…

0
642

शिरपूर ठाणेदाराच्या आशीर्वादाने अवैध व्यवसायांचा सुळसुळाट…

कायर गावातील जनता मटका व्यवसायाने त्रस्त

वणी/प्रतिनिधी : तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कायर या गावात शिरपूर पोलिसांच्या नाकावर टिचून मटका हा अवैध व्यवसाय सुरु आहे. अर्थ पूर्ण सहकार्य करीत शिरपूर पोलीस या अवैध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

 

 

सविस्तर वृत्त असे की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जरी जनतेला सांगत असले की अवैध व्यवसाय पूर्ण पणे यवतमाळ जिल्ह्यात बंद आहेत. परंतु शिरपूर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या कायर या गावातील वार्ड क्र 1, मादगीपुरा या ठिकाणी मटका हा अवैध व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे.

 

 

सुरुवातीच्या काळात छुप्या मार्गाने चालणार हा व्यवसाय आता राजरोस पणे एका उभारलेल्या तंबूत सुसज्ज व्यवस्थेसह सुरू आहे. कायर या गावातील सर्वसामान्य जनतेला या बाबत सर्व माहिती आहे. मात्र पोलिसांना या व्यवसायची माहिती नसावी ही एक शोकांतिका आहे. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार पोलीस मांजर बनून दूध पिण्याचे काम करीत आहे. आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा गंध या ठिकाणी दिसून येत आहे.

 

 

राजरोसपणे चालणाऱ्या या अवैध मटका व्यवसायामुळे गावातील जनतेचे आर्थिक कम्बरडे मोडले आहे. सुरवातीला कोरोना महामारीने व लोकडॉऊन ने जनता त्रस्त आहे. तर दुसरीकडे दिवसभर आपल्या मेहणतीतून मिळवलेला पैसा , नागरिक लवकर श्रीमंत होण्याच्या नादात गमावून बसत आहे. मात्र यात नागरिक श्रीमंत होण्यापेक्षा अवैध व्यावसायिक व संबंधित पोलीस अधिकारी गब्बर श्रीमंत होत आहे.

 

 

पोलिसांच्या या दुर्लक्षित पणा मुळे सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहे. या परिसरातील बिट जमादार हे रोजच या ठिकाणी भेट देऊन जात असल्याची व्यथा येथील काही सुजाण नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविली आहे. पोलीस अधीक्षक या गंभीर समस्या सोडविणार काय? शिवाय शिरपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन लुले याकडे लक्ष घालणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here