वणीत भुरट्या चोरांचा धुमाकुळ, शासकीय मैदानाजवळून सायकलची चोरी

0
628

वणीत भुरट्या चोरांचा धुमाकुळ, शासकीय मैदानाजवळून सायकलची चोरी

वणी/मनोज नवले : सद्या शहरात भुरट्या चोरांचा धुमाकुळ सुरु असुन पोलीस स्टेशन परिसरातील शासकीय मैदानावरुन शंतनू प्रविण मुने यांची सायकल चोरी गेली आहे. शंतनु हा दररोज मैदानावर पोलीस भर्ती ची तयारी करण्यासाठी येत होता. नेहमी प्रमाणे वाहतूक पोलीस कार्यालया मागे मैदानात जाण्यासाठी दरवाजा असून तिथे सायकल लॉक करून धावण्याच्या सरावासाठी गेला व आल्यानंतर पाहिले असता सायकल दिसुन आली नाही परिणामी सगळीकडे शोध घेतला, सर्व भंगार दुकान पाहिले मात्र कुठेही सापडली नाही.

 

याबाबत वणी पोलिसात तक्रार दिल्याची माहीती आहे. ब्लॅक रंगाची ए-वन सायकल असुन हँडलवर कार्तिक प्रविणराव नागपूरकर असे लिहून आहे. विद्यार्थ्यांनच्या सायकली चोरी गेल्या तर त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान होते. शंतनू ची सायकल चोरी गेल्याने कॉलेज, टायपिंग, शिकवणीला जायचे कसे? असा प्रश्न उपस्थित झाला. कारण घरची परिस्थिती जेमतेम आहे व आता सायकलच्या किमती खूप वाढलेल्या आहे. त्यात कोरोनाचे संकट असल्याने उत्पन्न पण कमी झाले आहे. त्यामुळे भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here