जाग्रूती महिला बचत गटाने केली चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांकडे रेती घाटाची मागणी !

0
451

जाग्रूती महिला बचत गटाने केली चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांकडे रेती घाटाची मागणी !

चंद्रपूर किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी

गावा समिपचा रेती घाटचा लिलाव न करता ताे महिला बचत गटाला देण्यांत यावा अश्या आशयाची मागणी चंद्रपूर जिल्ह्या अंतर्गत माेडत असलेल्या चिमूर तालूक्यातील काग (साेनेगांव)येथील जाग्रूती महिला बचत गटाच्या काही महिला पदाधिका-यांनी आज सोमवार दि.१२आँक्टाेबरला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली आहे .गेल्या दहा वर्षा पासून जाग्रूती महिला बचत गट गावात कार्यरत असुन महिला सक्षमीकरण हा एक शासनाचा भाग व उपक्रम आहे . या उपक्रमा अंतर्गत सदरहु महिला बचत गटाला रेती घाट देण्यात यावा असे प्रामुख्याने निवेदनात नमुद करण्यांत आले आहे .जिल्हाधिका-यांना निवेदन देते वेळी जाग्रूती बचत गटाच्या अध्यक्षा रंजना मेश्राम , पारबता रामटेके , कल्पना मेश्राम , दिक्षा मेश्राम , रसिका रामटेके , जिजाबाई गजभिये , निता धाेंगडे , भूरसन गजभिये , व पूनम रामटेके हजर हाेत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here