सावरी येथील वैद्यकीय अधीकारी यांची सेवा देण्यास टाळाटाळ

0
331

सावरी येथील वैद्यकीय अधीकारी यांची सेवा देण्यास टाळाटाळ
बोथली:समाजात डाँक्टरांना देवाचे स्थान आहे.कोरोना महामारीच्या काळात डाँ. योद्ध्याची भुमीका बजावत आहे,मात्र चीमूर तालुक्यातील सावरी येथील प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीकारी डाँ.शुभांगी मदनकर ह्या रुग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ करत असल्याने गावकरी तीव्र रोष व्यक्त करीत आहे.
सावरी येथील प्रा.आरोग्य केंद्रात 42 गाव येतात,त्यामुळे परीसरातील रुग्ण तपासणी करीता ईथेच येतात.मात्र येथील वैद्यकीय अधीकारी रुग्णांना कधीच हाताने किंवा स्टेथोस्कोपने तपासत नाही ,व त्याचा रक्तदाब सुद्धा घेत नाही.सध्या कोरोना असल्यामुळे सामाजीक अंतर ठेवावे लागते,ते ठीक आहे परंतु कोरोना यायच्या अगोदर सुद्धा त्यांनी हात लावुन तपासणी केली नाही असे ईथे येणार्या रुग्णांचे म्हणने आहे.
दर दिवशी दोन वेळ ओपीडी राहते,स. 9 ते 12 आणी सा. 4 ते 5 ,फक्त सकाळच्या ओपीडीला त्या हजर राहतात,सायंकाळी हजर राहत नाही.
तपासणीच झाली नाही, तर रोगाच निदान कसं लागेल,एखाद्या ऱुग्णाला गंभीर आजार झाला आणी त्याचे वेळेवर निदान नाही लागले तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो,अशी घटना दोन रुग्णासोबत घडली आहे,तरी रुग्णांची योग्य तपासणी करावी व पाच वाजेपर्यंत दवाखान्यात हजर रहावे अशी मागणी गावकरी करीत आहे.
सध्या कोरोना असल्यामुळे सामाजीक अंतर पाळावे लागते,व माझ्याकडे प्रा.आरोग्य केंद्र सावरी चा पदभार असल्यामुळे मला ईतर उपकेंद्राला भेट द्यावी लागते,व जीथे लसीकरण आहे तीथं जावे लागते,व दुसरा वैद्यकीय अधीकारी नसल्यामुळे मला चार वाजताची ओपीडी करायला वेळ मिळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here