विरुर स्टेशन येथे संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनी धोबी समाज बांधवाने केले अभिवादन…

0
223

विरुर स्टेशन येथे संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनी धोबी समाज बांधवाने केले अभिवादन…


विरुर स्टेशन शहरातील इंदिरानगर येथे काल दिनांक 20/12/2023 रोजी संत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून धोबी समाजाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे, दिनदुबड्याचे कैवारी दिवसा हातामध्ये खराटा घेऊन गाव स्वच्छ करणारे, कीर्तनकार व स्वच्छते चे मूलमंत्र देणारे स्वच्छतेचे जनक, देव दगडात नसून तो माणसात आहे असे पटवून देणारे, अज्ञान, अंधश्रद्धा आणि स्वच्छतेचा मूलमंत्र सांगून गोर गरीबाना जनजागृती करणारे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिना निमित्ताने विरुर स्टेशन शहरातील धोबी समाजाच्या वतीने महान संत गाडगेबाबांच्या प्रतिमेसह त्यांच्या शुद्ध विचारांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी अनिल आलम सरपंच, ज्ञानेश्वर तुराणकर धोबी समाज अध्यक्ष, प्रविण चिडे सामाजिक कार्यकर्ते, अशिल आलाम ग्रामपंचायत सदस्य, संगीता भोस्कर महिला अध्यक्ष, वंदना तुराणकर तपस्विनी चिंचोलकर, मारुती निमलवार, विलास निमलवार, सत्यपाल मेडपल्लीवार, सतीश श्रीकोंडवार, संदीप तुराणकर, बापूजी चिंचोलकर, स्वप्निल निमलवार, बालेश मेडपल्लीवार, गणेश तुराणकर, कृष्णा शिरसागर, शुभम भोस्कर, विजय निमलवार, दिलीप तुरानकर इत्यादी धोबी समाजाचे व मित्र मंडळाचे तरुण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here