पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली, १ मजूर घटनास्थळीच ठार! केळझर येथील घटना!

0
600

पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली, १ मजूर घटनास्थळीच ठार! केळझर येथील घटना!

(मूल) चंद्रपूर, किरण घाटे : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या केळझर येथील नदी काठावर असलेल्या पाण्याची टाकी आज बुधवार दि. १२मे ला सकाळी कोसळल्याने त्यात मोटर पंप लावण्यासाठी गेलेला एक २५वर्षिय मजूर घटनास्थळीच ठार झाल्याचे व्रूत्त प्राप्त झाले आहे.सदरहु घटनेतील म्रूतक मजूराचे नांव पुंडलिक रविंद्र मराठे असल्याचे गावक-यांनी या वेळी सांगितले .या दुदैवी घटनेत म्रूत्यूमुखी पडलेल्या मजूराची बातमी गावात वा-यासारखी पसरताच गावकरी मंडळी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले.
जो पर्यंत मृतकाच्या वारसांना भरपाई दिली जात नाही तोपर्यंत या घटनास्थळावरुन म्रूतकाचे प्रेत उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका गावक-यांनी घेतली हाेती असे एका प्रत्यक्षदर्शिने सांगितले दरम्यान घटनास्थळावरील व गावातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे पाेलिस पथक या शिवाय संवर्ग विकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असल्याचे समजते .
गत तीन-चार दिवसापासून केळझर येथील पाणीपुरवठा करणारे मोटर पंप बिघडले हाेते .ताे पंप दुरुस्त करण्यासाठी गेला असता उपरोक्त घटना घडली.सदरहु पाण्याच्या टाकीला भेगा पडल्या हाेत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here