टिळक महाविद्यालयात म. गांधी व शास्त्री जयंती साजरी

0
390

टिळक महाविद्यालयात म. गांधी व शास्त्री जयंती साजरी

वणी/यवतमाळ, मनोज नवले

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित, शिक्षण प्रसारक मंडळ व वणी द्वारा संचालित, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे राष्ट्रीय सेवा योजना द्वारे आज दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्री या दोन महामानवांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नीलिमा दवणे यांनी केले.

या कार्यक्रमात ज्या महाविद्यालयाच्या वतीने दि. 02/06/2021 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्तदान केले. त्यांना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक किशन घोगरे यांनी केले.

त्यानंतर स्वच्छ भारत स्वस्थ भारत या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालय कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here