गोंडराजकालीन किल्ला परिसरातील अतिक्रमणे हटवा

0
430

गोंडराजकालीन किल्ला परिसरातील अतिक्रमणे हटवा

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी

जिवती – चंद्रपूर जिल्ह्याचे वैभव असलेला गोंडराजकालीन ऐतिहासिक किल्ह्याच्या जटपुरा गेट चा काही भाग पाडून गेट परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी सुटणार नाही. त्या करीता प्रकोप परिसरातील भारतीय पुरातत्व विभागाच्या निकषाला व नियमांना डावलून झालेले अनाधिकृत बांधकामे,अतिक्रमने प्रथम हटवावे तसेच शासनाच्या नियमांना डावलून पराकोटाच्या आतील भागात आणि मुख्य रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवून त्यांना पराकोटाच्या बाहेर स्थलांतरीत करावे.या मागणीचे निवेदन गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढल्याने चंद्रपूर शहरात व जिल्ह्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने वाहनांच्या संख्येत ही वाढ झाली.परकोटाच्या आतील भागात शासनाच्या नियमांना डावलून मोठ्या प्रमाणात अतिक्रमने झालीत. अवैध टोलेजंग इमारती उभ्या झाल्या. तर मुख्य रस्त्यावर मोठ-मोठी अनाधिकृत व्यापारी संकुले झाल्याने शहराचे हृदय असलेल्या जटपुरा गेट परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याला प्रशासनाचा ढिसाळ कारभार कारणीभूत आहे.

जटपुरा गेट परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी गेट चा काही भाग पाडण्याची मागणी काही असामाजिक तत्त्व, संघटना करिता आहे.अशी मागणी करणे म्हणजे गोंड राजवटीचा इतिहास व अस्तीत्व मिटविण्याचा प्रयत्न आहे. या वरून त्यांची विकृत मानसिकता दिसून येते.

गोंड कालीन किल्ह्याचा जटपुरा गेट आणि गेटचा कोणताही भाग पाडण्यास गोंडवाना गणतंत्र पार्टी व समुदायाचा विरोध आहे.ज्यांना काही निर्माण करता आले नाही,त्यांचे संगोपन करता येत नाही त्यांना पाडण्याचा. आणि तशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार नाही.जटपुरा गेट या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी व गेट परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी शहरात १९५० नंतर झालेले नियमबाह्य अतिक्रमणे, बांधकामे पुरातत्व विभागाच्या दिशा निर्देशानुसार हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बापुराव मडावी, प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आत्राम, प्रदेश महासचिव अब्दूल जमीर भाई, चंद्रपूर पं.स.माजी सदस्य विनोद सिडाम, जिवती तालुका सचिव हनमंतू कुमरे, माजी सरपंच चिन्नूमामा कोडापे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here