अंगणवाडी मध्ये देण्यात येणाऱ्या भेसळ युक्त पोषण आहाराची तात्काळ चौकशी करा – राजु शंकरराव कुडे

0
376

अंगणवाडी मध्ये देण्यात येणाऱ्या भेसळ युक्त पोषण आहाराची तात्काळ चौकशी करा – राजु शंकरराव कुडे, शहर सचिव आप

 

गरिबांना वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारात सतत भ्रष्टाचार होत आले आहे मग त्यात चिक्की घोटाळा असो अथवा इत्तर, जनतेच्या करातून दुर्बल घटकांच्या आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याकरिता शासनाच्या अनेक योजना असतात मात्र त्या कागदावरच अस्तित्वात त्याची अंमबजावणीही बरोबर झालेली नसते, अश्याप्रकारे गरिबांची झालेली लूट जनतेत असंतोष निर्माण करणारी आहे. हे सर्व प्रकार थांबविले गेले पाहिजे.

याचेच एक उदा.म्हणजे बाबुपेठ मधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना द्वारे अंगणवाडी मध्ये वाटण्यात येणाऱ्या पोषण आहारातील तांदळामध्ये काही संशयास्पद घटक आढळल्याने लाभार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या बाबतची तक्रार आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ याची माहिती अन्न व औषध प्रशासन यांना दिली आणि आयुक्त मोहिते यांना त्या तांदळाचे नमुने घेऊन विश्लेषण करण्यात यावे आणि चुकीचे काही आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे..

यावेळेस आप चे शहर सचिव राजु शंकरराव कुडे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर भाऊ राईकवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, निखिल बारसागडे, दीपक निपाने, राहील भाई बेग, प्रवीण उंदिरवाडे, प्रवीण चुनारकर, श्रीमती सुजाता ताई बोदेले, ऐश्वर्या वासनिक, अंजू ताई रामटेके, पिंकी ताई कुकडकर, चंदु माडुरवार, अश्रफ सय्यद, कालिदास ओरके, अंकूश राजूरकर, सुखदेव दारूनडे, जयंत थूल, जयदेव देवगडे, बाबाराव खडसे, हितेश धाकडे, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here