यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन पार पडला चंद्रपूर नगरीत ३०तरुणींचा नेत्रदिपक सत्कार साेहळा !

0
518

यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन पार पडला चंद्रपूर नगरीत ३०तरुणींचा नेत्रदिपक सत्कार साेहळा ! युवती प्रमुख भाग्यश्री हांडेचा पुढाकार !अनेकांनी केली कार्यक्रमाची प्रशंसा ! 🟢चंद्रपूर🟣🔶किरण घाटे🟢🟠 विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय व माेलाची कामगिरी बजावणां-या चंद्रपूर नगरीतील ३०तरुणींचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच नेत्रदिपक सत्कार साेहळा पार पडला. चंद्रपूरात आज पावेताे जागतिक महिला दिनाचे बरेच कार्यक्रम पार पडले परंतु हा आयोजित साेहळा अत्यंत थाटामाटात पार पडला व ताे लक्षवेधी ठरला .अनेकांनी या कार्यक्रमाची मुक्तकंठाने कार्यक्रमस्थळी प्रशंसा केली .
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत यंग चांदा ब्रिगेड युवती विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते. उपरोक्त कार्यक्रमात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या शुभ हस्ते उल्लेखनिय कामगिरी करणां-या युवतींना सन्मान चिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. आयोजित कार्यक्रमाला कल्याणी जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका प्रमुख वंदना हातगांवकर, नगर सेविका सुनिता लोढीया आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. यंग चांदा ब्रिगेडच्या पुढाकारातुन महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय काम केल्या जात आहे. तदवतचं महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु आहे. दरम्यान जागतिक महिला दिना निमित्त शहरातील पठाणपुरा मार्गावरील जैन भवन जवळ असलेल्या कार्यालयात ३० युवतींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वकील प्रेरणा भास्कर साहारे, पोलिस विभागाच्या प्रदन्या गावडे,आकाशवाणी उद्घोशिका वर्षा काल्हे, क्रिडा क्षेत्रातील संगीता बांबोडे, डाॅ. दिशा चांदेकर, माॅडल पुजा पाॅल, उत्तम विद्यार्थी मयुरी आश्राम, एमबीए गोल्ड मेडलिस्ट रुचिता गर्गेलवार, एमएसईबीच्या दक्षता अधिकारी सुप्रिया भगत, ग्राम पंचायत सदस्या प्रतिक्षा देऊळकर, एमएसईबी विभागाच्या तृप्ती हलदार, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मेश्राम, कराटे पटु ज्योती जयपूरकर,अाकशवानी निवेदिका दिव्या हातगांवकर, शिल्पा कोंडावार, कोरोना योध्दा सपना बावणे, इंजी. प्राजक्ता उपरकर यांच्यासह एस टी महामंडळात कार्यरत 13 युवतींचा आमदार किशोर जोरगेवार व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. चंद्रपूरातील युवतींनी सर्वच क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटवीला आहे. त्यांची ही कामगीरी चंद्रपूरसाठी गौरवशाली असून त्यांचा हा प्रवास इतरासांठीही प्रेरणादायी असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार आपल्या भाषणात म्हणाले.सत्कार साेहळ्याला चांदा ब्रिगेडच्या आशा देशमूख, दूर्गा वैरागडे, विमल काटकर, नंदा पंधरे, सोनाली आंबेकर, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, वैशाली रामटेके, सविता दंडारे, कौसर खान, डाॅली देशमूख, प्राची नंदलवार, वैष्णवी निनजे, गायत्री येलादे वैशाली पिदूरकर, जास्मीन शेख आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री हांडे यांनी केले तर सुरेखा कांटगे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले .विशेष म्हणजे या नेत्रदिपक सत्कार साेहळ्याचे सुत्रसंचालन दिव्या हातगांवकर यांनी उत्तमरित्या केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here