अर्धनग्न आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले

0
320

अर्धनग्न आंदाेलनाने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले
किरण घाटे । विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्या अंतर्गत येणा-या नागभिड येथील स्वामी विवेकानंद मतीमंद मुलाच्या शाळेचे अध्यक्ष मंगल पेटकर ,सचिव पुरुषोत्तम चौधरी तथा शालेय मतीमंद व अनाथ विद्यार्थीं आपल्या मागण्यां करीता चंद्रपूर जिल्ह्याधिकारी कार्यालया समाेर दि.२५जानेवारी पासून उपाेषणाला बसले अाहे.
दरम्यान या कडे काेणाचेही अद्याप लक्ष वेधले नसल्यामुळे त्यांचे उपाेषण सुरु असुन अनेकांनी त्यांचे उपाेषण मंडपाला भेटी देवून त्यांचे मागण्या जाणून घेतल्या आहे . काल सोमवार दि.१फेब्रुवारीला शासनाचे लक्ष वेधण्यांसाठी मंगेश पेटकर , पुरुषोत्तम चौधरी व काही विद्यार्थ्यांनी चक्क अर्ध नग्न आंदोलन केले.
सामाजिक जबाबदारी म्हणून १८वर्षिय खाली मंतीमंद मुलांना पुरुषोत्तम चौधरी यांनी आपल्या शाळेत दाखल करुन घेतले . १००टक्के शाळेला अनुदान मान्यता द्यावी या करीता सन २०११पासून शासन दरबारी त्यांनी पत्रव्यवहार देखिल केला परंतु या बाबतीत शासनाने आज पावेताे कुठलाही निर्णय घेतला नाही .शासनाने एक तर नियमाप्रमाणे अनुदान द्यावे किंवा मतीमंद मुलांचे स्थानांतर दुस-या शाळेत करावे . संस्था चालकावर कर्जाचा बाेझा अधिक वाढल्यामुळे आपली संस्था शेवटची घटका माेजत असल्याचे त्यांनी प्रसिध्दीसाठी दिलेल्या एका निवेदनात नमुद केले आहे. शासनस्तरावर या बाबतीत याेग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यांचा इशारा पुरुषोत्तम चौधरी यांनी दिला आहे.
आज उपाेषणाचा ७वा दिवस असुन शासनाने या कडे लक्ष पुरवून याेग्य ताेडगा काढावा अशी अपेक्षा सर्वस्तरांवरुन व्यक्त हाेत आहे.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here