“त्या” हल्लेखाेरांवर तात्काळ कारवाई करा! या मागणीसाठी तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेचे चंद्रपूर जिल्ह्यात आज काम बंद आंदोलन !

0
665

“त्या” हल्लेखाेरांवर तात्काळ कारवाई करा! या मागणीसाठी तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेचे चंद्रपूर जिल्ह्यात आज काम बंद आंदोलन ! 🟢🟤🟡चंद्रपूर🟣🟥🔴 किरण घाटे🔴🟢🟡 उमरखेड तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार वैभव पवार , व स्थानिक तलाठी गजानन सुरोशे यांचे वर रेती माफियांनी केलेल्या भ्याड चाकू हल्या प्रकरणा बाबत आज मंगळवार दि. 2फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्हा तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटना जिल्ह्याच्या वतीने एक दिवस सामूहिक रजा घेऊन काम बंद आंदोलन पुकारण्यांत आले.तसेच हल्ले खोरांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यां बाबत एक निवेदन चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फत शासनास सादर करण्यांत आले .🟢🟣🔴🟧🟡🌟🟥🟤निवेदन सादर करतांना लोंढे, संजय डवळे ,श्रीमती प्रियंका पवार ,पल्लवी घाटगे, संपत खलाटे (सर्व उपजिल्हाधिकारी )या शिवाय चंद्रपूरचे तहसीलदार तथा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश गौंड संघटनेचे इत्तर पदाधिकारी उपस्थित हाेते . पुकारण्यांत आलेल्या आंदाेलनात चंद्रपूर जिल्हय़ातील सर्व तहसिलदार नायब तहसिलदार, सहभागी झाले असुन सदरहु आंदोलनाला जिल्हय़ातील कार्यरत सर्व उपविभागीय अधिकारी वर्गांनी स्वयंस्फुर्तीने आपले समर्थन दिले आहे .🟡🟢🟣🟧🟢महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी जीव धाेक्यात घालुन आपले काम प्रामाणिक पार पाडत आहे .परंतु अश्या हल्लेखाेरांवर अंकुश लावण्यासाठी शासनाने अधिकारी व कर्मचारी वर्गांना दिवस रात्र अधिक सुरक्षा पुरविणे तेवढेचं गरजेचे झाले आहे .अलिकडे अश्या घटनेत वाढ हाेत आहे हे तितकेच खरे आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here