नांदा फाटा – आवाळपूर परिसर बनले अवैध व्यवसायाचे माहेरघर

278

नांदा फाटा – आवाळपूर परिसर बनले अवैध व्यवसायाचे माहेरघर

पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका…

 

नांदा फाटा : नांदा फाटा – आवाळपूर परिसर हा औद्योगीक क्षेत्र म्हणून नावारूपास येत आहे. अनेक छोटे मोठे उद्योग या परिसरात भरभराटीस आले आहे. त्यामुळे आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणावर होवू लागली आहे. याचाच फायदा घेत अवैध व्यवसाय जोमाने सुरू असून जणूकाही हा परिसर अवैध व्यवसायाचे माहेर घर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

परिसर अवैध व्यवसायाने फोफावला असून अनेक नागरिक यात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. श्रम कमी आणि पैसा अधिकचा मिळत असल्याने तरूण पिढी हात धून अवैध व्यवसायाकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे.

सट्टापट्टी
मागील एक वर्षा पासून नांदा फाटा येथील बाजारपेठे मध्ये खुले आम सट्टा पट्टी चा बाजार चालू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर तिथे जुगार आणि ऑनलाईन रम्मी सारखे खेळ खेळल्या जात आहे. या ठिकाणी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दिवसभर ठिय्या मांडून असतात. यात झटपट श्रीमंतीच्या नादात युवा पिढी बर्बाद होत आहेत.

अवैध दारु विक्री
चंद्रपूर जिल्हा दारू बंद असतांना अवैध दारू विक्री जोमात सुरू होती त्यावर अंकुश लावणे कठीण झाले होते. आता मात्र जिल्हा दारू बंदी उठल्या नंतर देखील परिसरातील गावात पाहिजे तीथे दारू भेटत आहे. याला काही मोठ्या व्यापारी लोकांनी रसद पुरवून गावात व्यवसाय बनविल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर ड्राय-डे च्या दिवशी खुले आम दाम दुप्पट करून दारू विकल्या जात आहे.

अंमली पदार्थाचा वापर
नशा ट्रेण्ड च्या नावा खाली युवा पिढी नशा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती व वस्तूचा वापर करीत आहे. नांदा फाटा आवाळपूर परिसरात ही असाच वापर होताना दिसून येत आहे. गांजा, हकीम, व्हाइटनर, एवढेच नाही तर ब्राऊन सुगर सारखे पदार्थ चा निर्जन स्थळी बसून नशा करताना दिसून येत आहे.

अवैध कोंबड बाझार
जुगार कसा खेळायचा यासाठी करिता अनेक प्रयोग जुगार प्रेमी करीत आहे. कोंबड बाजाराला मोठ्या प्रमाणावर वाव आला असून कोंबडा खायला भेटते आणि पैसा सुध्दा भेटते म्हणून याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे.

अवैध ट्रान्स पोर्ट वाहतूक व डिझेल विक्री
औद्योगिकरनामुळे इथे ट्रान्सपोर्ट चालकांनी चांगलीच धुमाकूळ माजवून ठेवली आहे. मनमानी कारभार चालू असल्याने सर्रासपणे रस्ताच्या कडेला जड वाहतूक लावल्या जातात. यामुळे अनेकांचा अपघात झाला असून काहींना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. त्यातच ट्रक वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने अवैध डीझेल विक्री ला उत आला आहे. थातुर मातुर कार्यवाही सोडली तर अजुनही अवैध डिझेल विक्री ला लगाम लागला नाही.

नांदा फाटा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आहे. तसेच नेहमी पोलीस प्रशासनाची या परिसरात रेलचेल असते परंतू अवैध व्यवसाय करणाऱ्याना कोणत्याही प्रकारचा मोठी करवाई होतांना दिसून येत नसून उलट त्यांच्या मुजोरी वाढलेल्या दिसून येत आहे. यामुळे खाकी ची गरिमा कमी तर झाली नाही ना की पैसा च या जुमले बाजीत खाकी चा जरब कमी झाला असा प्रश्र्न आता सामान्य जनतेला पडू लागला आहे.

advt