शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करीत राजूर कडकडीत १०० टक्के बंद

0
485

शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करीत राजूर कडकडीत १०० टक्के बंद

शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करून खाजगीकरण बंद करण्याची मागणी

वणी (यवतमाळ) मनोज नवले : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारकडून करण्यात आलेला शेतकरी विरोधी कृषी कायदा, कामगार विरोधी श्रम संहिता, आरोग्य व शिक्षणाचे होणारे खाजगीकरण आणि देशातील सार्वजनिक उद्योग व सेवांचे होणारे खाजगीकरण रद्द करावे. यासाठी शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करीत राजूर ग्रामवासीयांनी स्वंयस्फूर्तीने कडकडीत १००% बंद करून मोदी सरकारचा निषेध करण्यात येऊन वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांच्या भारत बंद ला समर्थन करण्यासाठी राजूर येथे माजी पं स सदस्य मा. अशोक भाऊ वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली सर्व पक्ष व संघटनांनी एकत्र येत एक दिवस अगोदर बैठक घेऊन गावातील व्यापारी व दुकानदारांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज २७ सप्टेंबर रोजी राजूर वासीयांनी स्वयंस्फूर्तीने१००% कडकडीत बंद पाळुन मोदी सरकार चा शेतकरी विरोधी, कामगार विरोधी धोरणांच्या निषेध करण्यात आला.

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा, वीज दुरुस्ती विधेयक रद्द करा, शेतकऱ्यांना दीड पट हमीभावाचा केंद्रीय कायदा करा, पेट्रोल-डिझेल व गॅस चे भडकलेले दर कमी करा, मनरेगा चे कामाचे दिवस आणि वेतन दुप्पट करा, खाजगीकरणाद्वारे देश विकणे बंद करा आदी मागण्या करीत व त्याप्रकाराचे निवेदन राजूर ग्राम वासीयांद्वारे मा. उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मा. पंतप्रधान यांना पाठविण्यात आले.

या राजूर बंद च्या निमित्ताने गावातून मिरवणूक काढून सर्व प्रमुख रस्त्याने जात प्रत्येक चौकात असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. या वेळेस शाहिद भगत सिंग चौकात व कर्मयोगी गाडगेबाबा चौकात वक्त्यांनी भारत बंद चे कारण विशद केले. मुख्य म्हणजे आधीच ठरल्याप्रमाणे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद पाळण्यात आला. या आंदोलनात अशोकभाऊ वानखेडे, मो. असलम, कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान, कॉ. नंदकिशोर लोहकरे, ऍड. अरविंद सिडाम, जयंत कोयरे, अश्फाक अली, नितीन मिलमिले, राजेंद्र पुडके, महेश लिपटे, मो. शरीफ, एह्तेश्याम सिद्दीकी, अशोक भगत, लीलाधर अरमोरीकर, सरोज मून, शेख ताहीद, रायभान उईके, सुनील कुंभेकर, सोमेश्वर जांगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here