शेतकऱ्यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे

0
431

शेतकऱ्यांनी एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे

योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर: शेतकऱ्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास येणाऱ्या अडचणीमुळे दिवसेंदिवस मुद्दल व त्यावर वाढणारे व्याज तसेच बँकेची दीर्घकाळापासूनची थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला दि.31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाला 6 टक्के व्याज दराने व्याज आकारणी करण्यात येणार आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडून कर्जाची रक्कम वसूल करताना 1 एप्रिल 2004 नंतर बँकेने केलेले व्याजाचे मुद्दलीकरण रद्द करण्यात येणार असून सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांकडून 31 मार्च 2004 अखेर थकीत असलेल्या मुद्दल रकमेवर 6 टक्के व्याजदराने सरळ व्याजाने व्याजाची आकारणी करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हा भूविकास बँकेचे एकूण 129 कर्जदार सभासद असून त्यांच्याकडे सन 2020-21 या चालू वर्षात दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत व्याज अधिक मुद्दलासह रुपये 364.00 लक्ष बँकेच्या प्रचलित धोरणाप्रमाणे घेणे आहे. सर्व कर्जदार सभासदांनी दिलेल्या मुदतीत एकरकमी कर्ज परतफेड योजनेत कर्ज वसुलीचा भरणा केल्यास कर्जदार सभासदांना 287.19 लक्ष रुपयांची सवलत मिळू शकते.

एकरकमी कर्ज परतफेड योजनेत सहभागी न होणाऱ्या व दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत योजनेनुसार कर्जाची परतफेड न करणाऱ्या कर्जदार सभासदांच्या बाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील तरतुदीनुसार वसुलीची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या कर्जदार सभासदांनी बँकेच्या संजय गांधी मार्केट सिविल लाइन्स चंद्रपुर येथील कार्यालयातून योजनेची व आपल्या कर्जाच्या हिशेबाची माहिती घेऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार कर्जाच्या वसुलीचा भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here