नो मास्क नो एन्ट्री मोहीम हाती घ्या : खासदार बाळू धानोरकर
महाविकास आघाडी सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यास बिल पास करावे
चंद्रपूर : राजस्थान सरकारने दोन दिवसापूर्वी राज्यातील संपूर्ण जनतेला सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करणारे बिल पस केला. कोविड १९ चा फैलाव होऊ नये म्हणून या प्रकारचे बिल पास करणारे भारतातील प्रथम राज्य ठरल्या बद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. या धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने देखील जनहितार्थ विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्रात देखील मास्क अनिवार्य करणारे विधेयक पास करून बंधनकारक करावे अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
दिवाळीच्या सण काही दिवसावरच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची बाजार पेठांमध्ये गर्दी होत असते. दिवाळी नंतर कोविड १९ ची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. त्यामुळे या काळात खबरदारी घेणे महत्वाचे आहे. या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी सर्वानी मास्क लावणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यास बिल पास करावे हि लोकहितकारी मागणीमहाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.
त्यासोबतच या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने शेतकरी विरोधी लादलेले कृषी विधेयकात दुरुस्ती करून शेतकरी बचावाची भूमिका देखील घेण्याची गरज आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याच्या हिताचे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना हितकारक निर्णय घेण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या मागणीचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.