दक्ष नागरिक संस्थेच्या राष्ट्रीय महासचिव पदी प्रभूदास भोईर यांची नियुक्ती, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

0
328

दक्ष नागरिक संस्थेच्या राष्ट्रीय महासचिव पदी प्रभूदास भोईर यांची नियुक्ती, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

प्रतिनिधी – सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारी व मानवी न्याय हक्कासाठी लढणारी अशी जनसामान्यात ओळख असलेल्या दक्ष नागरिक संस्थेने संपूर्ण भारतातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. प्रत्येक राज्यात नवीन कार्यकारणी बनवण्याचे काम सुरू आहे. अनेक विभाग संस्थेने सुरु केले आहेत त्यात महिला, युवा, अल्पसंख्याक, रोजगार, ट्रान्सपोर्ट, कामगार, पत्रकार, चित्रपट आदी विभागांचा समावेश केला आहे. कळंबोली येथील समाजसेवक प्रभूदास भोईर यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून यांची राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर  यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. संस्था वाढवण्यासाठी मेहनत घेणार असल्याचे तसेच नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे मत प्रभूदास भोईर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here