येत्या २६ तारखेला चंद्रपूरात भव्य माेर्चा!

0
762

येत्या २६ तारखेला चंद्रपूरात भव्य माेर्चा!

हजाराेंच्या संख्येने आेबीसी बांधव राहणार माेर्चात सहभागी!

चंद्रपूर । किरण घाटे

आेबीसीची जणगणना करा या प्रमुख मागणीसाठी येत्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनी चंद्रपूरात ओबीसीचा भव्य माेर्चा आयोजीत करण्यांत आला असुन या माेर्चात हजाराें आेबीसी बांधव हजर राहणार असल्याची माहिती आज सकाळी यूवा नेते बळीराज धाेटे यांनी या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी दिली. विशाल मोर्चाच्या नियोजना साठी चंद्रपूर शहर व चंद्रपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक काल शुक्रवार दि .06 नोव्हें. 20 ला मातोश्री सभागृह चंद्रपूर येथे सायंकाळी 4 वाजता पार पडली. सदरहु बैठकीत मोर्चाच्या नियोजना साठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असुन चंद्रपूर शहरांत ओबीसी समाज कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेण्याचे सर्वानुमते ठरले.

बैठकीची भूमिका डॉ .राकेश गावतुरे यांनी स्पष्ट केली तर बळीराज धोटे यांनी चंद्रपुरात आयोजित विशाल मोर्चाच्या नियोजनाचे विवेचन केले. सर्वांनी आपल्या पुढील पिढीच्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी तथा मोर्चाच्या यशस्वीते करीता ओबीसीतील विविध जात समुहांनी संघटित हाेण्यांचे प्रयत्न करावे असे आवाहन या वेळी पदाधिकां-यानी केले.

बैठकीत उपस्थितांना अँडव्होकेट पुरुषोत्तमजी सातपुते, अँडव्होकेट दत्ताभाऊ हजारें, अँडव्होकेट फरहाद बेग, देवरावजी भांडेकर, प्रा. सूर्यकांत खनके, सतीश मालेकर आदिंनी संबोधित करुन माेलाचे मार्गदर्शन केले. अँडव्होकेट प्रशांत सोनुले यांनी मोर्चाच्या आयोजनाच्या निर्णया नंतर तालुका स्तरांवर झालेल्या विविध बैठकांची माहिती व आेबीसी बांधवाकडून मिळत असलेल्या प्रतिसादा बद्दल सविस्तर माहिती या वेळी दिली. या आयोजित बैठकीचे प्रास्ताविक प्रा. विजय मुसळे यांनी केले. मोर्चा बैठकीला विविध ओबीसी समाज घटकाच्या 200 पेक्षा अधिक पुरुष व महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here