व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाचा जिवन तोगरे प्रत्यशात करतो उपयोग

0
368

व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाचा जिवन तोगरे प्रत्यशात करतो उपयोग

प्रतिनिधी गोविंद वाघमारे

जिवती । समाजामध्ये कार्य करीत असतांना मोठ्या संख्येने लोक बोलतात की मी समाजकार्य करीत आहे. परंतु समाजकार्य आणि समाजसेवा यामध्ये जरी वरवर पाहता साम्य दिसत असते तरी त्यात बराच फरक आहे असे आपणास वाटते.

अतिशय दुर्गम/डोंगराळ भाग म्हणजे जिवती तालुका या भागात वास्तव्यास असणारा व समाजासाठी चांगला सुविधा सोई मिळवून देण्यासाठी धडपडणारा जिवन तोगरे “रुग्णसेवक” म्हणून नावारुपास येत आहे “प्रहार संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करणारा जिवन” इतरांना चांगलं आणि निरोगी जिवन प्राप्त व्हावे म्हणून व्यावसायिक समाजकार्य अभ्यासाचा पूर्णपणे उपयोग त्यांचा कार्यात करीत आहे.
सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय चंद्रपूर येथे शिक्षण घेत असलेल्या जिवन ने सैध्दांतीक ज्ञान व तंत्र आणि कौशल्य यांच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात लोकांना मदत करण्यास प्रगल्ब म्हणुन कार्यरत आहे.

ग्रामिण भागातील आदिवासी किंवा इतर कोणत्याही समूदाय असो त्यात आरोग्याच प्रश्न आहेत परंतु ग्रामीण आणि आदिवासी समुदायात मिळणाऱ्या आरोग्य विषय सुविधा फारच कमी, त्यात कोवाड-१९ चा प्रादुर्भाव अशा परिस्थितीत रुग्णांना योग्य मार्गदर्शनाची, मदतीची व उपचारांची तातडीने गरज असते. ही गरज रूग्णसेवक जिवन पूर्ण करण्यास प्रामाणिक प्रयत्न करतो.

‘जिवन विषयी सांगायचे कारण म्हणजे नूकतेच जिवन ने ४ रुग्णास ‘जिवन’ दिले असे म्हटले तरी चालेल. कॅन्सर, हृदय विकार, इतर पोटाचे दुर्दर आजाराने ग्रस्ताना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करून त्यांना योग्य उपचार मिळावा म्हणून जिवन यांने आपल्या स्व नेतृत्वाने व कौसल्याने प्रयत्न केला आहे.जिवती सारखा अतिदुर्गम भागात असा निस्वार्थपणे कार्र करण्यारा जिवन इतरांना आदर्श वाटेल असे कार्य करीत आहे. जिवती भागात, मनरेगा असो, घरकुल असो,पाण्याचे प्रश्न असो बरेच कार्यात जिवन कार्यरत आहे. परंतु दुर्दर आजाराने ग्रस्त लोकांना रुग्णसेवक मतद प्राध्यन्माने जिवन करतो आहे. या सर्व कार्यात कुठेही स्वाभोची किंवा शाबासकीची अपेक्षा नाही. परंतु जिवती सारख्या भागात असा कार्यकर्ता तयार होणे हे अतिशय सकारात्मक उदाहरण असून महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे एकटा व्यक्ती बरेच बदल घडवू शकतो.हे तत्त्वज्ञान अंगीकारलेल्या जिवन स्वत: पासुन समाजकार्यास प्रारंभ केला आहे.
त्यांच्या सर्व कार्यास आमच्या शुभेच्छा..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here