चांदुर बाजार शहरातील तहसील कार्यालयामध्ये दारूच्या रिकाम्या बॉटलांचा सळा.!

0
588


• एकाच दिवसांमध्ये परिसरातून साफ करण्यात आल्या बाटल्या
• CCTV फुटेज तपासून कारवाई करण्यासाठी उडवा-उडवीचे उत्तरे

तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे

अमरावती /चांदूर बाजार (कृष्णापूर):- चांदुर बाजार शहरातील तहसील कार्यालयामधील आतमधील परिसरामध्ये देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलांचा सळा पडलेल्या अवस्थेत काल पर्यंत होता परंतु माहिती मिळताच एकाच दिवसांमध्ये पळलेल्या दारूच्या बाटला एकाच दिवसांमध्ये साफ करण्यात आल्या आहे यामध्ये प्रामुख्याने ह्या सर्व बॉटल आल्या कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमध्ये तहसील कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा कमी होती तसेच कार्यालयामध्ये नागरिकांची ये जा सुद्धा कमी होती अश्या परिस्थितीमध्ये ह्या सर्व देशी दारूच्या रिकाम्या बॉटल्स आल्या कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.


तहसील कार्यालयामध्ये नेहमीच प्रौढ नागरिकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत नागरिकांची ये जा सतत चालूच असते विद्यार्थ्यांची येजा सतत चालू असल्याने त्यांना हे सर्व चित्र पाहून त्यांच्या मनामध्ये आपल्या तहसील कार्यालययाबद्दल कितपत आदर राहील असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसील कार्यालयामध्ये CCTV कॅमेरे सुद्धा आहेत कॅमेऱ्याची फुटेज तपासून ह्या सर्व बॉटल टाकणाऱ्यांवर q योग्य ती कारवाई करावी जेणेकरून या पुढे तालुक्यातील कुठल्याच प्रशासकीय कार्यालय परिसरामध्ये अशी हरकत कोणीच करणार नाही. ही कारवाई झाल्यास असे करणाऱ्या समाज कंळकासमोर मोठे उदाहर बनवून समोर येईल व यापुढे असे कोणी करण्याची हिंमत सुद्धा करणार नाही अशी अपेक्षा आहे.परंतु यावर संबंधितांकळून उडवा उडवीचेउत्तरे देण्यात येत आहे.
मद्यपान करणाऱ्यांचा नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामध्ये अनेक युवकांचे भवितव्य घोक्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तहसील कार्यालयामध्ये विद्यार्थी आपल्या शालेय कामानिमित्त येत असतात नवीन युवकांना हे चित्र असेच दिसले तर……!आज प्रत्येक विद्याथ्यांचे स्वप्न आहे प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत करण्यासाठी तयार आहे परंतु हे सर्व चित्र पाहून विद्यार्थ्यांनी कुठला आदर्श ठेवावा. तहसील कार्यालयातील आतील परिसरामध्ये देशी दारूच्या बटलांचा सळा पाळलेला असल्याने हे सर्व चित्र पाहणाऱ्या युवकांवर अश्या प्रकारे आदर्श निर्माण होईल असेच चालू राहिले तर काही दिवसांनी कार्यालायमधील परिसरामध्ये दारूची मैफिल जमायला वेळ लागणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here