अवैध रेतीचे ट्रँक्टर जप्त ! महसुल विभागाची कारवाई !

0
281

अवैध रेतीचे ट्रँक्टर जप्त ! महसुल विभागाची कारवाई !

🛑🟢चंद्रपूर🛑किरण घाटे🟡🔴

चंद्रपूर तालुक्यातील अवैध रेतीची वाहतुक राेखण्यांसाठी महसुल विभागाने आपले पाऊल उचलले असुन काल बुधवार दि.३०डिसेंबरला दुपारी १२वाजून ५५मिनिटांनी गुप्त माहितीच्या आधारे महसुल विभागाच्या एका पथकाने येथील स्थानिक बाबूपेठ परिसरातील लालपेठ समिपच्या एचपी गँस सिलेंडरच्या गाेडाऊन जवळ आशिष मनाेज बांबाेळे यास ट्रँक्टरने अवैध रेती वाहतुक करतांना पकडले . सदरहु वाहनाचा क्रमांक एमएच ०२टी ६३३९असा असुन अवैध रेती वाहन करणारे ट्रैक्टर बाबूपेठ निवासी साबुद्दीन खाँन यांचे मालकीचा असल्याचे सांगितल्या जाते .या घटनेतील त्या ट्रँक्टरचा जप्ती नामा करुन ताे ट्रँक्टर दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा करण्यांत आला अाहे उपरोक्त कारवाई चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी राेहन घुगे व तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शना खाली नायब तहसीलदार राजू धांडे तथा त्यांचे महसुल पथकाने केली अाहे .या आधी सुध्दा महसुल विभागाने चंद्रपूर तालुक्यात अवैध रेती वाहतुक प्रकरणात ब-याच कारवाया केल्याआहे हे येथे उल्लेखनीय आहे! .सध्या अवैध रेती वाहन पकडण्यांची माेहिम चंद्रपूर तालुक्यात जाेरात सुरु असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here