चिंचोली (बु.) ग्रामपंचायतीत सरपंच पदी पिलाजी भोंगळे तर उपसरपंच पदी पुष्पांजली धनवलकर यांची निवड

0
399

चिंचोली (बु.) ग्रामपंचायतीत सरपंच पदी पिलाजी भोंगळे तर उपसरपंच पदी पुष्पांजली धनवलकर यांची निवड

शंकर धनवलकर यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेचे नवे पर्व

विरुर स्टे.। चिंचोली बु. ग्रामपंचायतवर मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकहाती सत्ता होती. मागील निवडणुकीत शंकर धनवलकर यांच्या नेतृत्वात सात सदस्य निवडून आले होते. मात्र सेनापतीला सोडून दुसऱ्यासोबत हातमिळवणी केली. यामुळे त्यांना सत्तेच्या बाहेर राहावे लागले. मात्र या वर्षी धनवलकर यांनी परत पाच सदस्य निवडून आणून ग्रामपंचायतीवर आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झाले.

मागील निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन धनवलकर यांनी निवडणूक निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांना सुरक्षित स्थळी ठेवले. संपूर्ण जबाबदारीने सरपंच व उपसरपंच निवडणूक दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत सांभाळून ठेवले होते. मात्र त्यांना स्वतःला या निवडणुकीतून पराभव पत्करावा लागल्यामुळे सरपंच पदाची माळ त्यांच्याच नेतृत्वातील पिलाजी भोंगळे यांच्या गळ्यात घालावी लागली. तर उपसरपंच पदी पुष्पांजली शंकर धनवलकर यांची निवड करण्यात आली. यांच्यासोबत वंदना भीमराव खोब्रागडे, सरिता सचिन हजारे, भास्कर दादाजी घोडमारे हे सदस्य होते. सरपंच व उपसरपंच पदाचा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मिरवणूक रॅलीची परवानगी नसल्याने शंकर धनवलकर यांनी उपस्थित गावकरी जनतेचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here