उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा तथा महाराष्ट्रातील सहज सुचल ग्रुपच्या सदस्या पाेर्णिमा बावणे काळाच्या पडद्याआड!
मेघा धाेटे, मायाताई काेसरे, प्रभा अगडेसह अनेकांनी वाहिली त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली !

चंद्रपूर । किरण घाटे
चंद्रपूर नगरीतील उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा , सहज सुचलच्या सदस्या तथा नवभारत -नवराष्ट्र सुरुची वूमेन क्लबच्या संयाेजिका पाेर्णिमा बावणे यांचे बुधवार दि. ११नाेव्हेंबरच्या मध्यरात्री अल्पश्या आजाराने दुखद निधन झाले .गेल्या दाेन तीन महिण्यांपासुन त्या आजारी हाेत्या. दरम्यान त्यांचेवर चंद्रपूर व नागपूर येथे नामवंत डाँक्टर मंडळी कडुन उपचार सुरु हाेते. परंतु शेवटी त्यांचे अथक प्रयत्नाला यश आले नाही.सदैव सामाजिक कार्यात माेलाचे योगदान देणारी पाेर्णिमा इश्वराला प्रिय झाली . ती सकाळ या व्रूत्त पत्रामधील मधुरंगणची संयोजिका होती. एव्हढेच नाहीतर चंद्रपूर जटपूरा वार्डच्या नगर सेविका छबूताई वैरागडे व पाेर्णिमा बावणे यांची गत काही वर्षापासुन जिवलग व अतुट मैत्री हाेती. महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलच्या त्या एक सदस्या हाेत्या .दाेन वर्षापासुन त्या सातत्याने या ग्रुप वर कार्यरत हाेत्या . पाेर्णिमाचे शिक्षण एम .ए. बीएड, (बी .जे.) पर्यंत झाले हाेते.
शांत स्वभावाची तथा सर्वांना सहकार्य करणारी अशीच पाेर्णिमा हाेती. आज तिच्या निधनाची बातमी कानावर येताच सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे, सहसंयाेजिका मायाताई काेसरे, प्रभा अगडे, कविता चाफले, ज्याेति मेहरकुरे, सराेज हिवरे, पूनम रामटेके, प्रांजली दुधे, सह अनेकांनी दिवंगत पाेर्णिमाला भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.