गोंडपिपरीत पोलिस वर्धापन दिन साजरा
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
दि.८ शुक्रवार पोलीस विभाग गोंडपिपरीच्या पुढाकारातून पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्याने स्थानिक जनता महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजण करण्यात आले.
मुलांकरिता क्रीडा तर मुलींकरिता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करन्यात आले.विजेत्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करीत विद्यार्थ्यांना सायबर क्राईम,वाहतुकीचे नियम,महिला-मुलींवर होणारे अत्याचारापासून सुरक्षितता ,पोलिसांची कार्यप्रणाली याच्याबद्दल मार्गदर्शन करीत कोरोनापासून सतर्क व सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला.यावेळी ठाणेदार संदिप धोबे,प्राचार्य रामटेके,पीएसआय पटले,पोलीस कर्मचारी सत्यवान सुरपाम, गणेश पोदाळी,संजय कोंडेकर,संतोष काकडे व मोठ्या संख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.