‘त्या’ ८३ लाभार्थ्यांचे पैसे दोन दिवसात मिळणार!

0
246

‘त्या’ ८३ लाभार्थ्यांचे पैसे दोन दिवसात मिळणार!

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार यांचा पुढाकार

राजुरा । राहुल थोरात (विशेष तालुका प्रतिनिधी)

राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदी साईनाथ बतकमवार यांची नुकतीच निवड झाली असून त्यांनी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच केवायसी आणि अन्य कारणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे संतप्त असलेल्या ८३ लाभार्थ्यांना न्याय मिळाला असून येत्या दोन दिवसांत त्यांच्या खात्यात शासकीय मदतीचे पैसे जमा होणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार यांनी राजुराचे नायब तहसीलदार गांगुर्डे साहेब यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदतीपासून वंचित लाभार्थ्यांची अडचन लक्षात आणून दिली. नायब तहसीलदारांनी तातडीने कारवाई करून प्रश्न सोडवला. आता या सर्व लाभार्थ्यांना आपले अडकून पडलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रसंगी अनेक लाभार्थी त्यांच्या सोबत होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here