आपली शेतजमीन पुराच्या पाण्याखाली गेलेली पाहून शेतकरी झाले हवालदिल

0
431
  • आपली शेतजमीन पुराच्या पाण्याखाली गेलेली पाहून शेतकरी झाले हवालदिल…
  • गोंडपीपरी-
  • सततच्या पावसामुळे महाराष्ट्रातील कित्येक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर या गावालगत असणाऱ्या वर्धा नदीला मोठ्या प्रमाणात पुर आल्यामुळे, नदीला लागून असणाऱ्या कित्येक एकर शेतजमिनी ह्या पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत.त्यामुळे सकमुर गावातील शेतकऱ्यांना या पुराचा मोठा फटका बसला आहे.काळ्या मातीवर आपला उदरनिर्वाह करणारा शेतकरी,हाच शेतकरी आपली काळी आई पुराच्या पाण्याखाली डुबलेली पाहून त्यांचे अश्रु थांबेनासे झालेले आहेत.या पुरात त्यांची शेतीच नाही तर, शेतीला लागणारे अवजारे उदा.सोलर पत्रे,मोटार पंप,नांगर,वखर अशी कित्येक शेतीपूरक अवजारे ही वाहून गेली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here