खामोना ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतील प्राधान्यक्रम यादीत घोळ

0
353

खामोना ग्रामपंचायतीच्या घरकुल योजनेतील प्राधान्यक्रम यादीत घोळ

त्रिसदस्यीय समितीची चौकशी थंडबस्त्यात

राजुरा : खामोना ग्रामपंचायत अंतर्गत खामोना व माथरा गावातील २२४ लाभार्थ्यांची प्रधानमंत्री आवास योजनेत निवड करण्यात आली आहे. पण ही निवड नियम डावलून करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुळात लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेतून निकषांच्या आधारावर करण्यात येत असते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने मासिक सभेत लाभार्थ्यांची निवड केल्याने गावकऱ्यांनी घरकुल प्रपत्र ड यादीला आक्षेप नोंदवित तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. पण आजून पावेतो समितीला मुहूर्त मिळाला नसल्याने चौकशी थंडबस्त्यात आहे.

खामोना ग्राम पंचायतने २२४ लाभार्थ्यांची घरकुल योजनेकरिता निवड केली आहे. परंतु, ही निवड करताना पात्र कुटुंब व गरजूंना डावलण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुळात लाभार्थ्यांची निवड करताना अपंग, विधवा, निराधार यांना प्राधान्य देऊन प्राधान्यक्रम यादी तयार करण्याचे निर्देश आहे. सोबतच निकषात बसणाऱ्या व्यक्तींना सामावून घ्यावे असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेतून मार्गदर्शक सूचनेनुसार तीन प्रपत्रात करावे, असे नमूद आहे. पण ग्रामपंचायत प्रशासनाने मासिक सभेत लाभार्थ्यांची निवड करून ती ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आली असे गावकऱ्यांनचे म्हणणे आहे. नियमबाह्य यादी तयार करून गरजूंना शेवटी प्राधान्य देण्यात आल्याने या यादीवर आक्षेप नोंदविला आहे. या संदर्भात विचारणा केली असता दमदाटी करून आम्हीच यादी तयार करणार असल्याचे ठणकावले असा आरोप तक्रारकत्यांनी केला आहे.आपल्या मर्जीतील व्यक्तींना प्रथम प्राधान्य दिल्याने गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समितीने या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी त्री सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पण आजूनपावेतो समितीला चौकशी करण्याचा मुहूर्त मिळाला नसल्याने चौकशी थंडबसत्यात आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here