लाठी येथे जागतिक आदिवासी दिन जल्लोषात

0
614

लाठी येथे जागतिक आदिवासी दिन जल्लोषात

शेकडो आदिवसी बांधवांची उपस्थिती

राज जुनघरे

कोठारी / चंद्रपूर

जागतिक दिनाचे औचित्य साधून लाठी येथे मोठ्या जल्लोषात कार्यक्रम घेण्यात आला असून. एक तिर एक कमान आदिवासी एकसमान, जय रावण, क्रांतिवीर बाबुराव शेडमके अमर रहे अश्या जोशात घोषणा देत ढोलाच्या गजरात रॅली काढून सप्त रंगी झेंडा फडकवून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी माजी सभापती सुमनताई गेडाम होत्या तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. मधुकर कोटणाके, सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम, आदिवासी विचारवंत प्रभाकर गेडाम, संतोष कुलमेथे, अभिलाष परचाके उपस्थित होते.

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासींनी संस्कृती जोपासावी, व पूर्वजांच्या रूढी

परंपरेचे जतन करावे असे मत डॉ. मधुकर कोटणाके यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम यांनी राज्यकर्ती जमात आज मजूर कसे काय झाले यावर चिंतन करावा तसेच क्रांतीविर बाबुराव शेडमाके यांच्या कार्यावर प्रकाश टाकत स्थानिक व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून आदिवासींना

सावकारीच्या जाळ्यातून मुक्त करतांना विर बाबुराव शेडमाके शहीद झाले असून त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेऊन आदिवासींनी आर्थिक विकासाकडे वाटचाल करावी व जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संकल्प करावा असे मत सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम यांनी व्यक्त केले. यावेळी आदिवासी विचारवंत प्रभाकर गेडाम यांनी आदिवासी बांधवांनी परंपरागत व्यवसायाकडे वाटचाल करावी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगिकारावे असेही भाषणातून सांगितले. माजी सभापती सुमनताई गेडाम यांनी अध्यक्षीय भाषण केले. भाषणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला असून अनेकांनी सांस्कृतिक डान्स, गायन कलेचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वप्नील गेडाम, तर प्रास्ताविक तृप्ती गेडाम यांनी केले , कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी सूरज कुमरे, प्रफुल चौधरी, राजू गेडाम, विजय गेडाम, लाठी ग्रामपंचायत चे उपसरपंच साईनाथ कोडापे यांनी प्रयत्न केले असून अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here