सरल फांऊडेशन बामणी चा सत्कार…..

0
477

सरल फांऊडेशन बामणी चा सत्कार…..

बल्लारपूर तालुका प्रतिनिधी :- राज जुनघरे

दोन वर्षापासून कोरोना या महामरिने जगभरात हाहाकार माजवलेला आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत लाँकडाऊनच्या दरम्यान बामणी परिसरातील केमरिठ, अमितनगर येथील हातावर आणुन खाणारे गरिब व गरजु लोकांना सरल फांऊडेशन च्या टिमने घरोघरी जाऊन किराना किटचे वाटप केले, कोरोना रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासु नये म्हणुन रक्तदान शिबीर घेण्यात आले, त्यामध्ये सरल फांऊडेशन च्या 8 सदस्यासह गावातील 24 युवकांनी रक्तदान केले, विवाह सोहळा व वाढदिवसानिमीत्य गावात मास्कचे वितरण करण्यात आले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बामणी या गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, प्रशासनही हतबल झाले, आँक्सीजन च्या कमतरतेमुळे मृत्यूचे प्रमाण ही वाढायला लागले, बामणी गावातील रुग्णांसाठी लोकसहभागातुन आँक्सीजन काँन्सेन्ट्रेटर घेण्याचे ठरविले, यासाठी बऱ्याचशा लोकांनी देणगी स्वरुपात आर्थीक सहकार्य केले,(माफ करा सर्वाचे नाव लिहु शकत नाही.) लोकांच्या सहकार्यातुन आँक्सीजन काँन्सेन्ट्रेटर मशीन बामणी गावातील रुग्णांकरिता उपलब्ध करण्यात आली. कोरोना रुग्णांना आँक्सीजन ची आवश्यकता भासल्यास काँन्सीन्ट्रेटर मशीन सरल फांऊडेशनची टिम आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांच्या घरी जाऊन मशीन लाऊन देत होते,

आता कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी बामणी गावासाठी (परिसरातील इतर गावे) आँक्सीजन मशिन, विद्युत खंडित झाल्यास ईनव्हर्टर मशिन आणि सरल फांऊडेशन ची टिम सदैव तत्पर आहे. या सर्व कार्याची दखल घेवुन मा. श्री सुधिरभाऊ मुंनगंटीवार, आमदार तथा माजी अर्थ व वनमंत्री याच्या हस्ते कोविड योध्दा म्हणुन सरल फांऊडेशन टिम ला गौरविण्यात आले. बामणी गावातील लोकांचे सहकार्य व सरल फांऊडेशन च्या टिम चे परिश्रम यामुळेच हे साध्य होऊ शकले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here