ऐन तरुणाईत मुखाचा कॅन्सर, आर्थिक मदतीचे आवाहन, उपसरपंच राहुल भाऊ पाल यांचे आवाहन

0
954

पोंभुर्णा : तालुक्यातील जुनगाव येथील तरुण नामे राकेश गेडेकर याला मुखाचा अर्थात तोंडाचा कॅन्सर झाल्याने त्याची शारीरिक क्षमता अत्यंत कमजोर झाली आहे.जेवण करता येत नसल्याने कमजोर झाली आहे.ऐन तरुणाईच्या वयात हा आजार जडल्याने व त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ज्या आर्थिक दात्यांना मदत करायची असेल त्यांनी त्यांना मदत करावी असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी व उपसरपंच राहुल भाऊ पाल यांनी केली आहे. त्यांना उपचारार्थ नागपूर येथील मेडिकल मध्ये भरती करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून आणि उपसरपंच राहुल भाऊ पाल यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here