नागपूरात वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांचे मार्गदर्शन ! महिलांची उपस्थिती उल्लेखनिय !

0
565

नागपूरात वरिष्ठ पाेलिस निरीक्षकांचे मार्गदर्शन ! महिलांची उपस्थिती उल्लेखनिय !

🟡🟣🔶🔴🟢नागपूर🟡🟣किरण घाटे🟡🟣🟢नागपूर स्थित रमणा मारोती मंदिर, कामगार नगरातील राधाकृष्ण उद्यानात आज नंदनवन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुख्तार दाउत शेख यांनी या परिसरातील महिलांना विशेष मार्गदर्शन केले .या वेळी वाढत्या गुन्हेगारी , घर फोडी , दागिने लंपास करणे यावर महिलांनी काय खबरदारी घ्यावयास हवी या बाबत सविस्तर माहिती दिली.🟠🟡🟢🔴🔵🔵🟣🔵🔴🟢सदरहु कार्यक्रमाला महिलांनी देखिल उत्तम प्रतिसाद दिला . महिलांना येणाऱ्या समस्या त्यांनी या कार्यक्रमात मांडल्या. काही भागात गस्त वाढविणे गरजेचे आहे अशी सूचना सुध्दा करण्यात आली . 🟣🟢🟡🔴🟠🟤🔵🟠🔴🟡भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे यांनी आपल्या परिसरात ठिकठिकाणी अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे या वेळी आवर्जुन सांगितले . महिलांनी त्या साठी सहकार्य करून सहभागी व्हावे व सतर्क राहावे असे आवाहन नयना झाडे यांनी केले . 🔴🟡🟠🟢🟣🔵🟤🟢🟠🟡आयोजित कार्यक्रमाला हरमेश परमाल ( हेड कॉन्स्टेबल )यांनी विशेष सहकार्य केले तर ठोंबरे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.🟡🟣🟢🔴🔶🟤🔵🟠🟢🟡या वेळी इंगोले शुद्धलवार , तिजारे , चौधरी , अल्लेवर, संगीडवार ,नाटकर , लांजेवार , वठमोडे, पांडव , रेखा गाडवे , शुभांगी मानापुरे, ज्योती भेंडेकर , सोनू धांडे , पन्नासे , नंदनवार व परिसरातील महिला भगिनीं माेठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here