चामोर्शी तालुक्यातील २४ गावात मॅजिक बस संस्थेचे ऑनलाईन शिक्षण

0
456

कोरोना काळात मॅजिक बस चे सुप्त उपक्रम व विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला चालना 

Impact 24 news

चामोर्शी/प्रतिनिधी : कोरोनाचा मागील दोन वर्षापासून प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांना शिक्षणात खंडतेचा सामना करावा लागत आहे ऑनलाईन शिक्षण असले तरी, अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते.हेच विचार करून मॅजिक बस या संस्थेने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील २४ गावातील वय १२ ते १६ या वयोगटातील २००० मुलामुलींना विविध विषयावर जसे की शिक्षण, आरोग्य, मानसिक सुदृढता, स्त्री पुरुष समानता व जीवन कौशल्य या विषयावर विविध उपक्रमातून शिक्षण दिले जात आहे.या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गात उत्साह दिसून येत आहे.

२४ गावात विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेला चालना देण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने कोरोना काळात पालक वर्गानी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे चामोर्शी तालुक्यातील युवा मार्गदर्शक हे अत्यन्त प्रयत्नशील आहेत. “खेळा द्वारे विकास ” या उपक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील २००० मुलांसोबत जानेवारी २०२१ पासून उपक्रम राबविला जात आहे.

सध्याच्या परिस्थितीत कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत.तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन फोन कॉल व व्हाट्स अप्स च्या माध्यमातून जीवन कौशल्य व आरोग्यदाई गोष्टी शिकविण्याचे कार्य कोरोना काळातही सातत्याने सुरू आहे.

हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता मॅजिक बस संस्थेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, चामोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक योगिता सातपुते व युवा मार्गदर्शन वसंत पोटे,रोशन तिवाडे,झीन्नत सय्यद,सोनी शिउरकर व प्रफुल निरुडवार व पालक वर्ग हे परिश्रम घेत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here