मनसेच्या पाठिंब्याला मोठे यश, आमरण उपोषण यशस्वी…!

0
674

मनसेच्या पाठिंब्याला मोठे यश, आमरण उपोषण यशस्वी…!

 

 

कोरपना प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडचांदूर शहराचे युवा नेते अक्षय भांदक्कर व कोरपना मनसे तालुका माजी उपाध्यक्ष राजू गर्गेलवार यांनी दिनांक १९ मे ला उपोषणकर्ते प्रशांत खाडे व बंडू रासेकर यांची उपोषण स्थळी जावून उपोषणकर्त्याना भेट दिली व जाहीर पाठिंबा देण्यात आला.

 

१८ मे ला उपोषणकर्ते प्रशांत खाडे व बंडू रासेकर यांच्यासह अनेक गडचांदूर शहरातील नागरिकांनी नगर परिषद प्रवेशद्वाराजवळ प्रमुख मागण्या घेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्याने उपोषणकर्ते प्रशांत व बबलू रासेकर यांनी दिनांक १९ मे ला आमरण उपोषणाला सुरुवात केली. नगर परिषद अधिकाऱ्याकडून व सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारे उपोषणकरत्यांची साधी विचारपूही करण्यात आली नाही.

 

सलग ५ व्या दिवशी उपोषणकर्ते प्रशांत खाडे यांची आरोग्य प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात गडचांदुर ला दाखल करण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांची व सत्ताधाऱ्यांची झोप उडाली. त्यानंतर काही क्षणातचं नगर परिषदेचे मुख्यअधिकारी उपोषण स्थळी दाखल होऊन दखल घेण्यात आली.

 

उपोषणकर्त्यांच्या २ मुख्य मागण्या पैकी १ मागणी मंजूर करण्यात आली. दुसऱ्या मागणी साठी विशेष सभा आयोजित करून त्या विषयांवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारे नगर परिषद प्रशासनाकडून व सत्ताधाऱ्यांकडून आश्वासन देण्यात आले. शेवटी प्रमुख मागणी मंजूर झाली असून उपोषणकर्ते प्रशांत खाडे व बबलू रासेकर, मनसे युवा नेते अक्षय भांदक्कर व मनसे कोरपना तालुका माजी उपाध्यक्ष राजु गर्गेलवार यांच्या मध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्यायाविरोधात व गडचांदूर शहराच्या विकासासाठी प्रत्येक वेळी आवाज उचलत राहणार असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here