प्रभात याेगा ग्रूपच्या वतीने स्वातंत्र्य दिनी विविध स्पर्धा संपन्न

0
738

प्रभात याेगा ग्रूपच्या वतीने स्वातंत्र्य दिनी विविध स्पर्धा संपन्न

नागपूर, किरण घाटे – आज रविवार दि.१५आँगष्टला गोविंद एनक्लेव, गोविंद गोरखेडे काम्लेक्स सिमीनरी हिल्स नागपूर येथे प्रभात योगा गृपच्या योग साधीकांनी ७५ वा स्वातंत्र्य दिन थाटात व उत्साहात साजरा केला.

 

 

दरम्यान सकाळी 5:00 वाजता दररोजच्या योगवर्गाची सुरुवात करण्यात आली.योगा आसन घेवून 7:00 वाजता शांतीपाठ घेण्यात आला. त्यानंतर 7:30 वाजता देशाप्रती कृतज्ञता व आदर बाळगून राष्ट्रगीत म्हणण्यात आले .योगाबद्दल जनजागृती करण्याचा संकल्प करुन विविध स्पर्धा घेण्यांत आल्या. या शिवाय अम्रूत महाेत्सवी वर्षा निमित्त योगाला निगडीत असे खेळ या वेळी घेण्यात आले. विजेत्यांना पारिताेषिके वितरीत करण्यांत आली. मुख्य योग शिक्षिका मायाताई कोसरे यांचे प्रमुख उपस्थितीत या वेळी विविध कार्यक्रम पार पडले.

 

 

कार्यक्रमाला साधना गर्ग , नंदिनी वाकुडे सुनीता भुक्ते हसिना मंडल, सनी मंडल, ज्याेती सोलंकी, जानवी सोलंकी, विनी वाकुडे, सुनीता भुक्ते, मृदुला उमरे, संगीता अवचरे तथा या परिसरातील महिला व तरुणी माेठ्या संख्येने उपस्थित हाेत्या .अल्पाेहारानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here