चिमूर ची २४ तास पाणी पुरवठा योजनेचे काम एक महिन्यात सुरू होईल : आमदार बंटीभाऊ भांगडीया

0
363

चिमूर ची २४ तास पाणी पुरवठा योजनेचे काम एक महिन्यात सुरू होईल : आमदार बंटीभाऊ भांगडीया

आशिष गजभिये

चिमूर येथील रुकुडगिर मंदिर सभागृहाचे लोकार्पण कार्यक्रम

चिमूर : जेव्हा जेव्हा परमेश्वराकडे मागणी करीत असतो तेव्हा परमेश्वर भरपूर मला देतो. माजी जीप सदस्य स्व शालू येळणे काकू ची आठवण काढीत त्यांची सन 2012 ची सभागृह मागणी पूर्ण केली असल्याचे सांगत येळणे काकू हयात नसल्याची खंत व्यक्त करीत
या परिसरातील पिण्याची पाणी फार मोठी अडचण आहे. ही मला माहित आहे. ५८ कोटी रुपयांची पाण्याची योजना आणली परंतु नप मध्ये सत्तातर झाल्याने विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सुद्धा जिकून सुद्धा राज्यातील सत्तेने रोखून ठेवले आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास हेच आपले ध्येय असून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने ९०० कोटी रुपयांची विकास कामे रोखून ठेवले आहे.
येत्या एक ते दिड महिन्यात चिमूर २४ तास पाणी पुरवठा योजना सुरू करणार असल्याची ग्वाही आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दिली.

चिमूर येथील रुकुडगिर मंदिर सभागृहाचे लोकार्पण सोहळ्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते. यावेळी जीप उपाध्यक्ष सौ रेखाताई कारेकर, डॉ श्यामजी हटवादे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ चे सर्वाधिकारी प्रकाशपंत वाघ महाराज, राजू देवतळे बकारामजी मालोदे, बंडूभाऊ नाकाडे, पांडुरंग हजारे ,राजू दांडेकर आदी उपस्थित होते.
संचालन जयंत गौरकर यांनी केले. राजू देवतळे प्रकाश पंत वाघ महाराज यांनी मार्गदर्शन केले. आभार राजू दांडेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास रुकुडगिर मंदिर कमेटी सह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here