स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज – नंदाताई बावणे

0
500

स्त्री सक्षमीकरण ही काळाची गरज – नंदाताई बावणे

कोरपना येथे जागतिक महिला दिन

 

कोरपना प्रतिनिधी
कोरपना – स्त्री ही विश्वाची जननी आहे. तिला तिचे समान हक्क मिळून सक्षमीकरण होणे काळाची गरज असल्याचे मत कोरपना नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नंदाताई बावणे यांनी कोरपना नगरपंचायत व लोकमत सखी मंच तर्फे आयोजित जागतिक महिला दिन प्रसंगी आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या अल्काताई रणदिवे, प्रा.
ज्योती रेगुंडवार, लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका इंदिरा कोल्हे, शहर संयोजिका छाया जेनेकर , पर्यवेक्षिका वाघमारे, नगर पंचायत महिला व बालकल्याण सभापती मनीषा लोडे, उपसभापती आरिफा शेख , नगरसेविका देविका पंधरे, जोशना खोबरकर, राधिका मडावी, गीता डोहे, आशा झाडे, सविता तुमराम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. महिला मेळाव्याप्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात समयसूचकता स्पर्धेत प्रथम क्रमांक शारदा हजारे, द्वितीय अर्चना घुमे, तृतीय टिना गिरडकर, रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया उराडे, द्वितीय माधुरी टेकाम ,तृतीय क्रमांक किरण हिरादेवे, संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुहासिनी उमरे, द्वितीय किरण हंसकर, तृतीय क्रमांक गीताताई पिंपळशेंडे यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे संचालन डाखरे तर आभार नगर पंचायत चे उपाध्यक्ष
इस्माईल शेख यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here