जिप उच्च प्राथ शाळाभुरकुंडा बु येथे साविञीबाई फुले जयंती निमीत्य निबंध स्पर्धा

0
613

जिप उच्च प्राथ शाळाभुरकुंडा बु येथे साविञीबाई फुले जयंती निमीत्य निबंध स्पर्धा

राजुरा, ३ जाने. : ग्रामीण भारत महीला गृह उद्योग मंडळ, चंद्रपुर यांच्या संकल्पनेतुन आज साविञीबाई फुले यांच्या जयंती निमीत्य जि.प. उच्च प्राथ शाळा भुरकुंडा बु या शाळेच्या पटांगणात “स्ञी” जिवनावर तसेच “स्ञी शिक्षणाचे महत्व” अशा विविध विषयाला अनुसरूण निबंध स्पर्धा पार पडली. तसेच सदर प्राविण्यपुर्ण निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण सुद्धा उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना देण्यात आले. त्याच बरोबर “सन्माण गृहिणींचा” या उपक्रमांतर्गत बचत गटातील महिलांचा प्रमाणपञ देऊन सन्मान करन्यात आला.

तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हनुन लाभलेले अशोक अंबागडे यांनी महत्वाची बाब मांडली. आजची स्ञी कोणत्याही क्षेञात मागे राहलेली नाही. ति एक उद्योजकीय नेतृत्व आहे असे मत त्यांनी यावेळी बोलताना मांडले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मुख्याध्यापीका मंगला आञाम यांनी “स्ञी” आज अबला नसुन ति एक सामर्थ्यशाली भविष्याचे वैभव आहे. उद्याचे नावीण्यपुर्ण प्रभावशाली कौशल्य आहे. प्रत्येक क्षेञात आज अग्रेसर आहे असे सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल मादासवार, पोलीस पाटील, राजेन्द्र मादासवार, रंजना कोहपरे, बंडु मडावी, दुर्योधन सर, प्रविण मडावी, सौरभ मादासवार, सागर कातकर, प्रशिल भेसेकर, किसन बोबडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार शिक्षक बंडु मडावी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here