मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने वायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दीन साजरा

0
434

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर संस्थेच्या वतीने वायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका दीन साजरा

 

मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक देवेंद्र हिरापुरे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली व भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय वायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यात “रूरल रिकवरि” कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था गडचिरोली जिल्ह्यात काम करीत आहे.
वायगाव येथे 03 जानेवारी 2022 ला सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिवस म्हणून साजरि करण्यात आली या कार्यक्रमाचे मेश्राम हे होते तर प्रमुख अतिथि हिरपुरे हे होते या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात भाषण स्पर्धा, पोट्याटो रेस, संगीत खुर्ची, निबंध स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले बक्षीस वितरण शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम सर तसेच तालुका निरीक्षक हिरापुरे सर यांच्याकडून प्राप्त करण्यात आले. या कार्यक्रमात शाळकरी मुलांनी सक्रिय सहभाग घेतला आणि बक्षीस पटकावून घेतले. कार्यक्रमाची रूपरेषा डॉ. बी आर. आंबेडकर विद्यालय वायगाव येथील बाल पंचायत व आमचे गावातिल CV यांनी आखली होती आणि त्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागेन्द्र नेवारे. LSE, मंजुषा कुरेकर मॅडम LO, अनिल खोब्रागडे सर LO सुनील व कोमल CV तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.
कर्यक्रमाचे संचालय उरादे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन नागेन्द्र नेवारे सर जीवन कौशक्य शिक्षक यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here