कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सोनापूर येथे समाजकार्य पदवी महा. विदयार्थ्यांमार्फत जनजागृती

0
546

कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी सोनापूर येथे समाजकार्य पदवी महा. विदयार्थ्यांमार्फत जनजागृती

✍️सुखसागर झाडे गडचिरोली:-

चामोर्शी तालुक्यातील मौजा सोनापूर येथे फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथील समाजकार्य पदवी अंतिम वर्षातील विद्यार्थी रोशन मोगरकर व सुरज दुधबावरे या स्वयंसेवकांनी 26 जून 2021 ला शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर आयोजित शिबिरात दशरथ मांदाळे, प्रवीण गेडाम, राजेंद्र धंदरे, विशाल पिपरे, सुरज पिपरे, अमोल गेडाम, किरण मांदाळे, दुर्योधन पिपरे युवा मित्रांना सोबतीला सहकार्य घेत गावात येऊन,”कोविड – १९ च्या अनुषंगाने कोरोना विषाणू संबंधी लसीकरणाचे महत्त्व, अफवा व गैरसमजांचे निराकरण.”याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली, त्यांच्या मनातील गैरसमज दूर केलेत. तसेच त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांना संतुष्ट केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे लसीकरण मोहिमेत नक्कीच गती येईल. यावेळी आरोग्य केंद्र आमगाव म. चे मार्गदर्शक श्री डॉ सुरपाम साहेब, श्री शेषराव कोहळे उपसरपंच, विठ्ठल करनासे mpw, प्रगती खोब्रागडे आरोग्य सेविका, गीता धकाते आरोग्य सेविका, वाहन चालक अविनाश टिकले उपस्थित होते . सोनापूर येथील ग्रामस्थांच्यावतीने व ग्रामपंचायत प्रशासनतर्फे प्रा. डॉ खंगार प्राचार्य, प्रा.डॉ गौर सर फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, गडचिरोली यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here