निलेश गायकर यांचा वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडा कोविड सेंटर ला 21 हजार रुपयांची औषधे व 161 शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप.

0
613

निलेश गायकर यांचा वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडा कोविड सेंटर ला 21 हजार रुपयांची औषधे व 161 शालेय विध्यार्थ्यांना शालेय साहित्य चे वाटप.

 

प्रतिनिधी ✍🏻ज्ञानेश्वर गायकर

अहमदनगर/संगमनेर :- ब्राम्हणवाडा येथे पठार भागातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक इंजि.निलेश ज्ञानदेव गायकर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे एक हात मदतीचा संकल्पनेतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्राम्हणवाडा येथील कोविड सेंटर ला सुमारे 21 हजार रुपये किमंतीची जीवन आवश्यक औषधे यांचा पुरवठा व मातोश्री लक्ष्मीबाई संगारे प्राथमिक आश्रम शाळेतील सुमारे 161 विध्यार्थ्यांना शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आले…
याप्रसंगी बोलताना निलेश गायकर म्हणाले , गेल्या अनेक वर्षांपासून मी माझा वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व एक हात मदतीचा संकल्पनेतून आपल्या विभागात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविडं सेंटर व आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांना फुल ना फुलांची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत केली. यापुढे देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असे सामाजिक उपयोगी उपक्रम करत राहणार असल्याने त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी ब्राम्हणवाडा गावचे माजी सरपंच भारत आरोटे बोलले की युवा कार्यकर्ते निलेश गायकर यांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे यामुळे अनेक नवीन कार्यकर्त्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळते..कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत निलेश गायकर यांनी उपक्रम कार्यरत केला.
निलेश गायकर यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असून गेल्या 9 ते 10 वर्षांपासून सदैव अविरतपणे असा सामाजिक उपक्रम साजरा करत असतात.
दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने पठार विभागातील विविध भागात सामजिक उपक्रम युवा कार्यकर्ते इंजि.निलेश गायकर यांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे त्यांच्या या कार्याचा सर्वच स्तरातून नेहमीच स्वागत केले जात आहे..
यावेळी अशोक सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधाकरराव शिंदे,युवा सामजिक कार्यकर्ते निलेश गायकर , माजी सरपंच देवराम आप्पा गायकर, माजी उपसरपंच भारत आरोटे , जेष्ठ नेते धोंडिभाऊ चव्हाण , युवा नेते अक्षय आरोटे , चेतन जाधव , श्रीकांत गायकर, संकेत जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत टाले, डॉ.सोनवणे सर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here