बकऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0
779

बकऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

राजुरा, १२ फेब्रु. : लक्कडकोट येथील चार नग लहान-मोठ्या बकऱ्या ७ तारखेला रात्री गोठ्यातून चोरीस गेल्या. या प्रकाराची माहिती मालकाने विरुर पोलिसांना दिली. अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३८० अन्वये विरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अखेर पोलिसांना त्या भुरट्या बकऱ्या चोरट्यांना पकडण्यात यश आले असून एका आरोपीस ताब्यात घेतले तर दुसरा चोरटा फरार आहे.

सविस्तर वृत्त असे की, लक्कडकोट येथील अंदाजे २० हजार रुपये किमतीच्या चार नग बकऱ्या दोन आरोपींनी पळविल्या. पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे तातडीने फिरवत सिसिटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे येथील स्थानिक रहिवासी असलेले गणेश पांडुरंग किन्नके (२२) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी काशीद शेख उर्फ बबलू हा फरार आहे. यावेळी आरोपीकडून ४ पैकी ३ नग बकऱ्या ताब्यात घेतल्या. तर एक बकरी चोरट्यांनी विकली असल्याची शंका आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर स्टेशन पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल चव्हाण, पोलीस हवालदार दिवाकर पवार, लक्ष्मीकांत, प्रमोद सुरेंद्र, प्रवीण, नरगेवार, सविता यांनी पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here